समाजाच्या प्रगतीचे मुळ म्हणजे “ अंगणवाडी सेविका ” :- महेश पवार* स्वामिनी तर्फे “ गौरव सावित्रीचा ” हा अनोखा सत्कार सोहळा

यवतमाळ प्रतिनिधी:- सावित्री आईने स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि या पायावर आज महिलांची उन्नती बघतोय . तेव्हा उदाहरण देतांना पहिल्या पंतप्रधान , राष्ट्रपती अथवा समाजातील प्रसिद्ध महिलांचे उदाहरण दिल्या जात. हे आदर्श खरे आहेतच मात्र या दरम्यान ग्रामीण भारतात दिसणाऱ्या प्रगतीचे मुळ कारण हे अंगणवाडी सेविका आहेत . बाळाच्या जन्मापुर्वी पासून ते शाळेतील प्रवेशापर्यत सेवा देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात . असे मत स्वामिनी जनआंदोलनाचे अध्यक्ष महेश पवार यांनी गौरव सावित्रीचा कार्यक्रमात व्यक्त केले . सदर कार्यक्रमात घाटंजी येथे महिला शिक्षण दिन व सावित्री आईंच्या जयंती निमित्ताने अंगणवाडी सेविकांचा सत्कार सोहळा घाटी येथील शिंपी समाज मंदिर येथे निमित्त पार पडला .


सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी ३ जानेवारी रोजी महिलांचा सत्कार सोहळा व्हायचा मात्र यावर्षी या राज्य सरकारने हा दिवस महिला शिक्षण दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरात फुले , शाहू , आंबेडकरी विचारांच्या जनतेला आनंद झाला . याप्रसंगी राज्यभरात दरवर्षी प्रमाणे महिलांचा सत्कार सोहळा सर्व ठिकाणी साजरा केला गेला मात्र घाटंजी येथे एक अनोखा सत्कार सोहळा पार पडला . या सोहळ्यात समाजाने दुर्लक्षित केलेला अतिशय महत्वाचा वर्ग म्हणजे अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला . ग्रामीण भागात शासनच्या योजना गरोदर माता ते मुल यांच्यापर्यंत पोहोचविणारा हा वर्ग शासन व समाज दोघांनी दुर्लक्षित केला . अशा सेविकांचा सन्मान पत्र व गुच्छ देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . वर्षा गंगशेट्टीवार , सुनिता डोहळे , सुरेखा भोंग , पुष्पलता गजभिये , कल्पना बिजेवार , विना कर्णेवार या घाटंजी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला .
स्वामिनी जनआंदोलन हे महेश पवार यांच्या अंतर्गत चालणारे संघटन असून आज राष्ट्रीय स्तरावर दारू बंदी , कृषी , उमेद अशा असंख्य महत्वाच्या आंदोलनात नेतृत्व करीत आहे . याच दरम्यान स्थानिक स्तरावरील स्त्रियांना व्यवसाय , समाजकारण , राजकारणात संधी मिळावी याकरिता देखील ते काम करीत आहेत . या दरम्यान त्यांनी अंगणवाडी सेविकांना माई नावाचे सन्मान पत्र लिहिले ज्यात अंगणवाडी सेविका भावूक झाल्या . सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ता रामभाऊ किरनापुरे , प्रमुख अतिथी स्थानी शंकर लेन्गुरे ता. अध्यक्ष माळी समाज , जलमित्र राजेंद्र गोबाडे , वं. बहु. आ. चे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे , माजी नगरसेविका किशोरी चौधरी , अनिता गरड , संदीप बिजेवार , रा. वि. नगराळे , उपस्थित असून अमोल झाडे , धीरज भोयर , विजय कासार , योगिता पवार , रेहाना बानो , रेखा खांड्रे , सुष्मा पोटपिल्लेवार , वैशाली कैलासवार , संध्या गोडे यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *