सुसंस्कार विद्यामंदिर येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

यवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे राजमाता जिजाऊ यांची व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव के संजय सर आणि प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.के.उषा मॅडम उपस्थित होत्या पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक या तिन्ही विभागात घेतल्या गेलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. ज्या मातेने बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बाळकडू रुजविले अशा रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ व ज्यांच्या मुखातून अमेरिकेमध्ये उस्फूर्तपणे भारत भक्तीचे स्तोत्र स्फुरले व ध्यानप्रियता अध्ययनशिलता व चित्ताची पवित्रता या गुणांनी युक्त असणारे एक अद्भुत व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पकाळात मानवितेचे नवीन विचार नव भारताचा शोध, रामकृष्ण मिशनची स्थापना यासारखे अनेक कार्य केले, अशा महान व्यक्तिमत्त्व बद्दलचा आदर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण ,कविता व वेशभूषा यांच्याद्वारे प्रगट केले.
माध्यमिक विभागातून विद्यार्थी इशिता पावडे ,मंजिरी कचरे, स्वानंदी गुल्हाने, गणिका जांगिड उन्नती घोगरे , श्रावणी तिजारे, सुजल फाळके,नैतिक रावेकर, दिव्या भांबेरे, नमन राठोड, देव अग्रवाल, पूर्वा देशमुख, श्रृती पेटकर, श्रावणी चंद्रे, आर्या देवघरे , आदित्य बोंगुलवार, अनुजा राऊत ,गौरी खेडकर, पवित्र देऊळकर ,श्रावणी पाचकोर, आकांशा बिजवे, श्रीया ताटकर, जान्हवी लुटे ,जुई मांडळे, राधिका बोबडे, दिपीका भोयर शांभवी पांडे लक्ष्मी नागपुरे हर्ष देशमुख, खुशबू जाजू, सर्वेश वानखेडे , रुद्रायणी देशपांडे.
तसेच प्राथमिक विभागातील कुंज मालवी ,समर्थ पिवलटकर,आरोही बोरुंदिया, सानवी राऊत, आराध्या पिवलटकर, अमय पखाले, चिराग चिके, विहान मिथे ,काव्या भोयर, रिया माकोडे, पर्णवी भैड, श्रुतिका वाकोडे ,अन्वी माकाेडे ,आनंदी पवार, अभय महल्ले , आनंदी महल्ले, अवनीश गावंडे,आराध्या चौधरी, देवयानी शेंडे ,अक्षया रोडे ,आर्या बारी, ह्दया देशपांडे, आराध्या तम्मेवार, अनुष्का दांडे, वरद सावरगावकर, सई रायकर जागृती राठोड, संपदा नालमवार, समर्थ तीजाणे आभा गुप्ता, प्रतीक बोसांले,आयुष अफूणे, सांनवी तोडगे, हर्षल जांगिड, अभिनव देशपांडे, कश्यप निचले ,देव्यानी हिंडोचा, शर्वरी घोडे ,मधुरा गोरे, राशी भूसांगे ,वंशराज अजनकर, प्रियांशू कोचे ,हर्षवर्धन मालेकर, परवली मारावर ,मधुरा जूनुनकर, तनिष्का इंगोले,
पूर्वप्राथमिक विभागातून सर्वेश बत्तलवार, कार्तिक रावेकर , दक्षित मजूमदार ,अर्णव बडनोरे, सानवी ठाकरे, रितिका किन्हीकर, श्रीरंग परसोडकर, देवांश हीडोंचा ,जतिन देवकर, रुद्र तेले, समर्थ घाडगे, आरोही टाटाची, वेदां नीनावे, शिवांश राठोड, नित्या घोडे, प्रियांशू कुंभारे अंशिका गुप्ता, सानवी भैड, श्रीहर्ष खोडवे इत्यादी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करून आपल्या भाषणाद्वारे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाळेच्या शिक्षिका सौ. वैशाली चौधरी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून एकता व संघटन व स्मरणशक्ती चा वापर कसा करायचा हा संदेश दिला.
त्यानंतर शाळेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री के. संजय सर व प्रमुख पाहुण्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. उषा कोचे मॅडम यांनी विविध प्रसंग व कवितेच्या माध्यमातून माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनप्रवासाचे व त्यांच्या कार्याचे उपयुक्त माहिती पर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मनीषा उदार मॅडम व विद्यार्थिनी कुमारी सानिका यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कुमारी शर्वरी वरुडकर हिने केले कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.