जिल्ह्यात चार मृत्युसह 280 जण पॉझेटिव्ह  182 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 6 : गत 24 तासात जिल्ह्यात चार मृत्युसह 280 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 182 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 58 वर्षीय, 76 वर्षीय, 55 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 280 जणांमध्ये 178 पुरुष आणि 102 महिला आहेत. यात यवतमाळातील 82 रुग्ण, पुसद येथील 69, दिग्रस 26, पांढरकवडा 8, वणी 6, दारव्हा 13, घाटंजी 2, महागाव 14, नेर 8, उमरखेड़ 8, बाभूळगाव 27, आर्णी 8, राळेगाव 2, कळंब 1, मारेगाव 1आणि 5 इतर रुग्ण आहेत.
शनिवारी एकूण 1505 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 280 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1225 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1875 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18973 झाली आहे. 24 तासात 182 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16623 आहे. तर जिल्ह्यात एकूण 475 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 170904 नमुने पाठविले असून यापैकी 169528 प्राप्त तर 1376 अप्राप्त आहेत. तसेच 150555 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed