खासदार बाळू धानोरकर यांच्या पालकमंत्री संदीपान भुमरे यांना लोकहितकारी सूचना

यवतमाळ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर वाढत आहे. त्याकरिता योग्य नियोजन व टीम वर्क असणे गरजेचे आहे. RTPCR टेस्ट केलेल्या व्यक्तीला २४ तासात रिपोर्ट मिळत नाही. त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला रुग्णायलात दाखल करण्या करीता आणखी काही तासाचा कालावधी जात असतो. या काळात तो शेकडो लोकांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे त्याची RTPCR टेस्ट झाल्यानंतर त्याच्या हातावर शिक्का मारणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उद्योगाच्या सीएसआर फंड कोरोनासाठी वापरा, जिल्यातील १६ तालुक्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या, जिल्यात आठ स्वतंत्र ऑक्सीजन प्लॅन्ट उभारा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा तसेच प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण भागातील शाळा ताब्यात घ्या अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीवेळी बोलत होते.
यावेळी खासदार भावनाताई गवळी, माजी मंत्री संजय राठोड, आमदार चतुर्वेदी, आमदार अशोक उईके, आमदार निलय नाईक, आमदार संजूरेड्डी बोदकुलवार, आमदार संदीप दुर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष पवार ताई,नगराध्यक्ष चौधरी ताई, आमदार वजाहत मिर्झा जी, पोलीस अधीक्षक भुजबळ, यांच्यासह अन्य सन्मानीय पदाधिकारी व अधिकारी यांची उपस्थिती होती.
त्यासोबतच केंद्र पद्धतीने रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, काही रुग्णालय त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय हे बेड उपलब्धतेची माहिती ऑनलाईन पद्धतीने कुटुंबीयाना देत नाही. ती देण्यात यावी, नागपूरच्या धर्तीवर खासगी रुग्णालयाला रेमडीसीव्हियर च्या पुरवठा जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत करण्यात यावा, रुग्णांच्या नावावर रेमडिसिव्हिर दिल्याची नोंद प्रत्येक रुग्णालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास करावी, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नकारात्मक बातम्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा अशा अन्य सूचना यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना केल्यात. ह्या लोकहितार्थ सूचना असून याची अंमलबजावणी त्वरित करण्याचे आदेश पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी यांना केले.
जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढत आहे. हि चिंतेची बाब आहे. या काळात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये खासगी रुग्णालयाची यंत्र सामुग्री घेऊन खासगी डॉक्टरांची सेवा घेतली पाहिजे. या माध्यमांतून वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे देखील सोईचे होणार आहे. त्यामुळे वरील सर्व बावी तातडीने अमलात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान थांबविण्यासाठी सर्वानी योग्य नियोजन करून टीम वर्क करून रुग्णाची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.