October 5, 2022

विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार नानाभाऊ पटोलेंचा वाढदिवस शेतकरी स्वाभिमान दिन ; गरजुंना देणार मदतीचा हात

यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशात गंभीर परिस्थिती असल्याने आपल्या वाढदिवसानिमित्य कोणताही अनाठायी खर्च न करता गरजुंना मदत करावी अशी अपेक्षा नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे हा दिवस शेतकरी स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय काँग्रेसतर्फे घेण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार व नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गरजू कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन काँसंट्रेटर चे वितरण करण्यात येईल.

कोरोनाने मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या गरजू कुटुंबाला बी-बियाणे देण्यात येणार आहे. कोरोनाने मृत पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान राशींसह सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गरजू सलून कारागिरांना अन्नधान्याचे वितरण तसेच स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबतच्या नातेवाईकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजयबाबू दर्डा, खा.बाळासाहेब धानोरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, ॲड. सचिन नाईक, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार वामनराव कासावार, विजयराव खडसे, कीर्तीबाबू गांधी, विजयाताई धोटे, नंदिनीताई पारवेकर, प्रकाश पाटील देवसरकर, बाळासाहेब मांगुळकर, डॉ. मोहम्मद नदीम, प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, माधुरीताई आडे, जीवन पाटील, तुकाराम कोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे.

कोविड नियमांचे पालन करून निमंत्रितांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम होणार आहे. कार्यकर्त्यांनी बॅनर अथवा इतर कोणता खर्च न करता आपापल्या स्तरावरही गरजुंना मदत करावी असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, उपाध्यक्ष अशोकराव बोबडे, अरुण राऊत, तातूजी देशमुख, राहुल ठाकरे, मनीष पाटील, माणिकराव मेश्राम, विजय राऊत, शंकर नालमवार, अनिल गायकवाड, नितीन जाधव, सुरेश चिंचोळकर,जावेद अन्सारी, इजहार शेख, विवेक मांडवकर, उत्तमराव गेडाम, रमेश चव्हाण, स्वाती येंडे, अरुण खंडाळकर, संगीता पारधी, पल्लवी रामटेके, रमेश महानुर, प्रकाश छाजेड, कृष्णा कडू, महेश खडसे, रवींद्र ढोक, विलास देशपांडे, चंदू चौधरी, दिनेश गोगरकर, अतुल राऊत, वनमाला राठोड, राजीव कासावार, कौस्तुभ शिर्के, जाफर खान, अरुण ठाकूर, कृष्णा पुसनाके, संजय ठाकरे, उमेश इंगळे, जितेश नावडे, प्रदीप डंभारे,
यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed