उंच उंच मी उडणार आहे—–शब्दरचना पराग पिंगळे यवतमाळ

##उंच उंच मी उडणार आहे##
उंच उंच मी उडणार आहे
त्या निळ्या नभावरी,
खोल खोल मी शिरणार आहे
निळ्याशार अश्या त्या सागरी ।।
दृष्टीने मी भेडणार आहे
दाट धुक्याला पहाट प्रहरी,
स्वतेजाने भेदणार आहे
काळ रात्रीला त्या तिमिरी ।।
चक्रव्यूह मी भेदणार आहे
संकटे घेऊनी उरावरी,
स्व दुःख दूर सारणार आहे
सत्कर्म करण्या ह्या भुईवरी ।।
सत्व मी जपणार आहे
ईश स्मरण जिव्हेवरी,
तत्व मी जपणार आहे
घनघोर त्या युद्धभूमीवरी ।।
चारित्र्याने निखरणार आहे
संस्कार करणार स्वतःवरी,
व्रत निस्वार्थतेचे पाळणार आहे,
मात करण्या दुःखावरी ।।
काव्य रचना गुंफणार आहे
शब्द वार करण्या मर्मावरी,
कार्य असे मी करणार आहे
स्मृतीत राहण्या या भूवरी ।।
उंच उंच मी उडणार आहे…….
उंच उंच मी उडणार आहे……
शब्दरचना
पराग पिंगळे
यवतम