गोपालन व संरक्षण सर्वांचे कर्तव्य – पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ
” गोष्टमी उत्सव संपन्न “
यवतमाळ। १३ नोव्हेंबर
प्रतिनिधी : कृषी प्रधान भारतात गाय व गोवंश महत्वाचे प्राणी आहेत, पशुधनाचे संवर्धन व संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. येथील गोरक्षण संस्था करत असलेले गोपालनाचे कार्य अभिनंदनीय आहे, पण अनुकरणीय देखील आहे. मी स्वत: गायीची सेवा करतो, देशात गो व गोवंश हत्या होणार नाही याची काळजी प्रशासना सोबत नागरिकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ यांनी केले. ते स्थानीय गोरक्षण संस्थेत गोपाष्टमी निमित्त गोपूजन, तुलादान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तर सोबतच अखिल भारतीय वैष्णव चतुर्सप्रदायाचे अध्यक्ष १००८ श्री महंत सावरिमाजी महाराज यांनी गोपाष्टमी ची कथा सांगुन प्रत्येकाने किमान एक गाय तरी पाळण्याचे आवहन केले. गाय व गायी पासून उत्पन्न गोमय पदार्थात, रोगनिवारक झाली असून वैज्ञानिक कसोटीवर ही गायीचे महत्व अधोरेखित झाले असल्याचे सांगीतले. व्यासपीठावर प्रमुख अतिथीं सोबत अध्यक्ष अनिल अटल, पुर्व अध्यक्ष नंदलाल बागडी, सत्कारमुर्ती मख्खनलाल भुत व विजय लोढा विराजमान होते.
प्रथम डॉ.दिलीप भुजबळ पाटील व सावरीया महाराज यांनी गोपूजन करुन तुलादान केले, हे उल्लेखनीय.
यवतमाळातील सर्वात जुनी गोररक्षण संस्था १९०८ मध्ये श्री शिलेदार गुरुजी यांनी स्थापन केली. आज संस्थेत २७१ गायी व गोरे आहेत, असे सांगून अध्यक्ष अँड.अनिल अटल यांनी पुढील योजनांची माहिती दिली. याप्रसंगी गोसेवक मख्खनलाल भुत व विजय लोढा यांना पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रास्ताविक राजेंद्र निमोदिया यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन सचिव किसनलाल सिंघानिया यांनी केले. मानत्राचे वाचन गणेश गुप्ता यांनी केले. आयोजनासाठी कोषाध्यक्ष केतन मजेठिया, रमेश मंगतानी, घनश्याम बागडी, भरतभाई शह, प्रदिप ओमनवार, किशोर दोषी, प्रशांत बनगीनवार, रामजीलाल शर्मा, ब्रिजमोहन भरतीया आदींसह व्यवस्थापक व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.