डॉ अशोक पाल हत्याकांड क्षुल्लक कारणावरून
यवतमाळ जिल्हा पोलिसांनी आज खुनाचा उलगडा करीत तीन आरोपींना अटक केली आहे ऋषिकेश गुलाबराव सावळे प्रवीण संजीव गुंडजवार व एक विधिसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
त्या दिवशी तीनही आरोपी मोटरसायकलवरून जात असताना मृतक डॉक्टर लोकपाल यांना धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वादातून भांडणं झालेत त्यावरून आरोपींनी चाकूने डॉक्टर अशोक यांच्या छातीवर पोटाच्या खाली दोन ठिकाणी वार करून घटनास्थळावरून पळ काढला डॉक्टर अशोक यांच्या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडूनच शंभरच्यावर खबरी नेमण्यात आले पोलिसांची सहा पथके नेमण्यात आली अखेर जिल्हा पोलीस दलाकडून 48 तासांच्या आत डॉक्टर अशोक यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे