यवतमाळ येथे सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलकांना दिले भोजनदान
यवतमाळ
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटी कामगारांचे बऱ्याच दिवसा पासून राज्यभर तसेच यवतमाळ येथील जुने बसस्थानकासमोर मागण्यांना घवून बरेच दिवसापासून दिवसरात्र उपोषण सुरु आहे. या उपोषणामध्ये सामील असलेले एसटी महामंडाचे कर्मचाऱ्यायांना आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सुभाषभाऊ सोळंकी तसेच जनार्दनभाऊ कांबळे यांनी व त्यांच्या टिमने भोजन वाटप केले.
त्यांनी हा भोजनाचा उपक्रम राबवून सुरु असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यातून पाठींबा दर्शवीला आहे. एसटी महामंडाच्या मागण्यांना घेवून सुरु असलेल्या उपोषण कर्त्याच्या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य करुन त्यांना न्याय द्यावा.
अशी आशा सुभाषभाऊ सोळंकी तसेच्या त्यांच्या संपुर्ण मित्रमंडळाने यावेळी व्यक्त केली आहे.