मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी गवळी संघटनाच्या वतीने कारवाईची मागणीसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन

वसंत नगर पोलिस स्टेशन च्या हद्दीमधील श्रीरामपूर स्थित गोकुळ रेसिडेन्सी गार्डन मध्ये काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली त्यामुळे सामाजिक भावना दुखावण्याचा प्रकार समोर आल्याने व ही माहिती सर्वदूर पसरल्याने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी स्थानिक एका रहिवाशाने वसंत नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा विरोधात गुन्हे दखल करण्यात आले आहे.या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज शनिवारी गवळी संघटनाच्या वतीने निषेधाचे निवेदन देत मूर्ती विटंबनाप्रकरणी समाजकंटकांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन गवळी समाज बांधवांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले.

सदर निवेदनावर श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष अमोल साखरे, अरुण पुलाते, शरद कुबडे, सुनील पुलाते, अरुण मोटे, मंगेश करण, अक्षय मुळे, नारायण पुलाते,संतोष ढोकणे,दिगंबर मंदडे,पुंडलिक ढोकणे, योगेश मंदाडे,रामकृष्ण बोरकुट, पवन भालेराव, योगेश साखरे, राजेंद्र मुळे ऋषिकेश पुळाते,उद्धव पांढरे, गणेश देशमुख, एकनाथ पूलाते, राजकुमार धाड,यासह अनेकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *