“अस्तित्व फाउंडेशन तर्फे दिवाळी निमित्य गोरगरिबांचे तोंड गोड”

Yavatmal:_ अस्तित्व फाउंडेशन तर्फे गोर गरीब व गरजू लोकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
गोरगरिब व्यक्तींचीही दिवाळी आनंददायी होण्यासाठी अस्तित्व फाउंडेशन तर्फे गरजू व अतिशय गरीब अशा कुटुंबांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला, फराळ वाटप करण्यात आले.
‘दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान फराळ मिळावा म्हणून अस्तित्व फाउंडेशन तर्फे दर वर्षी हा उपक्रम हाती घेतला जातो.
या अंतर्गत गाव खेड्यातील गरीब व झोपडपट्ट्यांतील कुटुंबांना फराळ देण्यात येतो दातृत्वाची परंपरा लाभलेल्या अस्तित्व फाउंडेशन तर्फे . अशा अन्य उपक्रमांतून याची साक्ष यापूर्वी आली आहे. त्यामुळे मासोळी जामडोह टाकळी मोहा असेगाव अशा गावागावात जाऊन अस्तित्व फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष सौ करूणा अविनाश धनेवार यांनी फराळाचे वाटप केले
गोरगरिबांच्या जीवनात थोडा दिवाळीनिमित्त गोडवा आणण्याचा प्रयत्न सौ करूणा धनेवार यांनी केला आहे
जवळपास पस्तीस गरीब कुटुंबांना दिवाळीचा मुख्य फराळ चिवडा लाडू चकली अनारसे व चिरोटे यांचे वाटप करण्यात आले आहे आणि भविष्यातही ही गोरगरिबांसाठी दिवाळी अशीच साजरी करण्यात येईल असे आवाहन अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्षा सौ अलका विनोद कोथळे यांनी केलेले आहे