आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 225 वी जयंती साजरी

यवतमाळ: आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 225 वी जयंती नेताजी नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यवतमाळ च्या वतीने संपन्न झाली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण सरकटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स्मारक समितीचे सचिव मनोज रणखांब राजाभाऊ इंगोले, अडो. सुरज पाखरे, यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. एडवोकेट राख पाखरे म्हणाले की भारतामध्ये क्रांतीची पहिली सुरुवात लहुजी वस्ताद यांनी केली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या शाळेला संरक्षण दिले त्यानंतर मनोज भाऊ रणखांब म्हणाले लहुजींच्या अण्णा भाऊंचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे आहे लहुजी चा इतिहास जयंती पुणे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आता संबंध महाराष्ट्र साजरी होत आहे तरुणांनी युवकांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही संघटीत होणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण सरकटे सर म्हणाले मातंग समाजाचा इतिहास ज्वलंत आहे कला गुणांनी संपन्न आहे लहुजींचे घराणे शिवरायांच्या घराण्याची नाळ जोडली आहे शिवरायांनी लहुजी राऊत नावाची पदवी दिली होती असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरातील स्मारक समिती अध्यक्ष पंडितराव वानखडे, तरूण युवावर्ग अतुल शिखरे, श्री गायकवाड, अशोक पांडव, दिनेश खडसे, अजय यंगड, शरद हिवराळे, रोहन हिवराळे, जोगदंड व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुराजी तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य श्री राजू गवळी यांनी केले.