दिगंबर जैन सैतवाळ संस्था दिनदर्शिका प्रकाशन संपन्न,

यवतमाळ :- प्रात : स्मरनिय आचार्य श्री आर्यनंदी महाराज जी यांचे आशीर्वादाने श्री १००८भ. महावीर दिगंबर जैन मंदिर वाघापूर येथील आचार्य विद्यासागर सभागृह मध्ये मान्यवर
जैन मंदिर वाघापूर अध्यक्ष विनोद महाजन, सैतवाळ संस्था माजी विदर्भ कार्यकारणी सदस्य डॉ. शेखर बंड, जिल्हाध्यक्ष सुरेश फुलंब्रिकर,अनिल चानेकर,नरेश पीसोळे,नंदकुमार इंगोले, दिलीप कहाते,संजय भोकरे,ज्योती पीसोळे,सुनीता फुलंब्रिकर यांचे हस्ते संपन्न झाला.

या दिनदर्शिका मध्ये महत्वपूर्ण माहिती जसे अल्पसंख्याक शैक्षनिक कर्ज योजना,योग बाबत माहिती,पंचांग,संपूर्ण भारतामधील जैन तीर्थशेत्रे संपर्क नंबर,शुभ मुहूर्त, आरोग्य बाबत माहिती,सणांचे बाबत महत्त्वपूर्ण माहिती,जैन धर्माचे धर्मशाळा चे नंबर असून सर्वांग सुंदर अशी सुबक मांडणी केली आहे