वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर भ्याड हल्ला;____लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात..!

 

पुसद: विधानसभा मतदार संघातील काळी दौ. येथे दि.३ डिसेंबर २०२१ रोजी २:३०ते३:०० वाजण्याच्या सुमारास दोन धर्माच्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाल्याने या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाची हत्या करण्यात आली ही बातमी संपूर्ण मतदारसंघात वार्‍यासारखी पसरली त्यातच या घटनेमुळे दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण होऊन हिंसक वळण घेतले या घटनेची माहिती पुसद मतदार संघाचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक, आणि विधान परिषदेचे आमदार ॲड. निलय नाईक, यांनी घटनास्थळाला भेट देण्यासाठी गेले असता ही माहिती काही पत्रकारांना मिळाल्याने हे पत्रकार वृत्तांकनासाठी घटनास्थळी गेले दोन्ही आमदार जमावाला संबोधित करत असतांना जय महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी संदेश कान्हु मुकाबला न्यूज २४ चॅनलचे सय्यद फैजान यांनी वृत्तसंकलन करणे सुरु केले असता अचानक या पत्रकारांवर रात्रीच्या वेळी ८:०० वाजण्याच्या सुमारास जमावाने हल्ला चढविला व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.


त्यावेळी घटनास्थळी हजर असलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व दंगल नियंत्रण पथक पोलीसाच्या तत्परतेने हल्लेखोराच्या तावडीतून या दोघांना सोडविण्यात येऊन हल्लेखोरांना पांगविण्यात यश आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु हजर असलेल्या या नेत्यांनी जमावाला असे कृत्य करू नका म्हणून साधी अपील सुद्धा केली नसल्याची माहिती आहे पण या प्रतिनिधींना आमदारांनी आपल्या गाडीत बसून पुसद येथे आणले.या प्रतिनिधी जवळील कॅमेरा,माईक,
बुम,आयडी,रोख रक्कम लुटल्याची माहिती प्रतिनिधी झेप न्यूज शी बोलताना दिली असल्याने या हल्ल्यात प्रसंगावधाने व पोलीसाच्या तत्परतेने हे पत्रकार किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या भ्याड हल्ल्याचा पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असून! तसेच संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणे हा सुसंस्कृतपणा नव्हे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शासनाने अद्दल घडवणे आवश्यक आहे. अशा घटनाचे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारावर हल्ला कारणे ही अत्यंत शरमेची बाब असून शासनाने या पत्रकाराला न्याय द्यावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करावी. पत्रकाराच्या संरक्षणासाठी त्वरित ठोस पाउल उचलण्याची गरज आहे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed