खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शेतकरी संघटनेचे नेते गजानन किन्हेकर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

yavtmal : मारेगाव तालुक्यातील स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नरेंद्र पाटील ठाकरे, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, गजानन किन्हेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, उत्तम गेडाम, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष कुलसंगे, सभापती शीतल पोटे, वसंत असूटकर, रवींद्र धानोरकर, रमण डोहे, मारोती गौरकार यांची उपस्थिती होती.
अनिल परचाके, मस्की, सतीश मस्की, अनिल परचाके, मारोती परचाके, नानाजी गौरकार, नाशु बदकी, बापूजी उरकुडे, गणेश ठक, विलास किन्हेकर, राजू कोयचाडे, महादेव राजूरकर, धीरज किन्हाकडे, छत्रपती किन्हेकार यासह शेकडो अन्य मान्यवरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
मारेगाव नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. सध्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. स्वराज्य युवा शेतकरी संघटनेची ताकत काँग्रेसला मिळणार असल्याने नगरपंचायत निवडणुकांचे गणित पूर्णपणे बदलणार असल्याचे सांगितल्या जात आहे.