पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी.

 

हल्ल्यासंदर्भात पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सोपविले निवेदन

पुसद / प्रतिनिधी:- महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुसद येथील दोन पत्रकार बंधूंवर वार्तांकन करीत असताना जमावाने भ्याड हल्ला चढविला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या जवळील साहित्य बळजबरीने लुटले. या घटनेचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आले.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो प्रत्येक घटनेचे वार्तांकन निर्भीड व निष्पक्षपणे तो समाज व शासन तसेच प्रशासनासमोर मांडत असतो अशातच अतिसंवेदनशील भागात जाऊन सुद्धा जीव मुठीत घेऊन पत्रकारिता करतो

मात्र सद्या पत्रकार असुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली.

मागील घटने प्रमाणे पुन्हा शुक्रवारी काळी दौलत खान येथे झालेल्या पत्रकारांवरील भ्याड हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पुसद येथील जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कान्हु

आणि मुकाबला न्यूज-24 चे प्रतिनिधी अँकर सैय्यद फैजान

यांच्यावर काळी दौलत खान येथे हल्लेखोरांनी शुक्रवार दिनांक 03 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे आठ वाजता च्या सुमारास 30 ते 40 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढविला

तसेच पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हल्लेखोरांनी पत्रकारांजवळील संपूर्ण साहित्य रोख रकमेसह अंदाजे 80 हजार पर्यंतच्या मुद्देमाल बळजबरीने लुटले.

सदर घटना ही जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री दिलीप भुजबळ पाटील, मा उपविभागीय अधिकारी श्री सावन कुमार, तसेच पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांच्या सह पुसद येथील आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या समोर घडली हे विशेष. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनासमोर जर चौथ्या आधार स्तंभावर हल्ला झाला आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे

. अशा घटना वारंवार घडू नये. या घटनेतील हल्लेखोरांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद तालुक्यातील समस्त प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाच्या पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच इतर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले

. सदर निवेदनावर जेष्ठ पत्रकार ललित सेता, दीपक हरीमकर, हरिप्रसाद विश्वकर्मा, यू.एन. वानखेडे, ॲड. अनिल ठाकूर, मारोती भस्मे, दीपक महाडिक, सैय्यद मुजीबोद्दिन, प्रदीप नरवाडे, अमोल व्हडगिरे, रुपेंद्र अग्रवाल, बळवंत मनवर, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे, गणेश राठोड, संजय कुमार हनवते, राजेश ढोले, रामदास कांबळे, रवि मोगरे, बाबूलाल राठोड, प्रकाश खंडागळे, मनीष दशरथकर, दिनेश खांडेकर,राजू सोनूने, अनिल चव्हाण, अहमद पठाण, शेख शब्बीर, हाफिझ रब्बानी, मुबाशिर शेख, बाबा खान, पवन चव्हाण, उमेश जाजू, विजय निखाते, अमोल ठाकूर, शेख अक्रम, वर्षा कांबळे, मजीद खान, सुहास पवार, प्रकाश खिल्लारे, समाधान केवठे, सैय्यद फैज़ानोद्दिन, संदेश कान्हु, संतोष मस्के, संजय रेक्कावर आदी पत्रकारांचे सह्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed