गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात करणे कायद्याने गुन्हा माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस
गुन्हा माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस
हेल्प लाईन क्र.1800-233-4475 यावर नोंदवा तक्रार
यवतमाळ प्रतिनिधी :- गर्भधारणा किंवा प्रसवपुर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन करून किंवा गर्भलिंग चाचणी किंवा अवैधरित्या गर्भपात केले जात असतील किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करत असतील तर अशा केंद्राविषयी किंवा व्यक्ती विषयीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना कळविल्यास त्यांना एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
गर्भलिंगाची अवैध चाचणी अथवा अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या बातमीची खातरजमा करून व त्या अनुषंगाने नंतर संबधीत सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र व्यक्तीवर खटला दाखल केल्यावर संबंधीत व्यक्तीस रुपये एक लाख बक्षीस देण्यात येईल. ती व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी कोणीही असू शकेल. माहिती देणाऱ्या व्यक्ती बद्दल गुप्तता ठेवण्यात येईल.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास हेल्प लाईन क्र.1800-233-4475 किंवा www.amchimulagi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अथवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ यांना कळवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्स डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे.