यवतमाळ येथे क्रीडा संमेलनाचे आयोजन
यवतमाळ येथे क्रीडा संमेलनाचे आयोजन
यवतमाळ प्रतिनिधि :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्त्याने क्रीडा भारती यवतमाळ व कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ यांचे संयुक्त वतीने दिनांक 24 ते 26 डिसेंबर रोजी आजादी का अमृत महोत्सव क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यात मैदानी स्पर्धा कबड्डी खोखो या खेळाच्या स्पर्धा होणार आहेत मैदानी स्पर्धेत 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 400 मीटर धावणे व चार गुणी ला शंभर मीटर रिले या प्रकारांचा समावेश आहे मैदानी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होतील, तर कबड्डी स्पर्धा अभ्यंकर कन्या शाळेत दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होतील तसेच खो-खो स्पर्धा अभ्यंकर कन्या शाळेत 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होतील. यवतमाळ शहर व जिल्ह्यातील जवळपास 30 शाळा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे.त सदर स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा भारती व क्रीडा शिक्षक यांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आलेले आहेत.सांघिक खेळातील विजयी उपविजयी संघांना बक्षिसे दिली जाणार आहेत, तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या खेळाडूंना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत सोबतच तिन्ही क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडूंनाही वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाला जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत पवार, क्रीडा भारती विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख राजेश गडीकर,आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स प्रशिक्षक स्वर्ण सिंह आंतरराष्ट्रीय खेळाडू निहारिका वशिष्ठ यवतमाळ जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू जॉन उपस्थित राहणार आहेत. असे यवतमाळ जिल्हा क्रीडा भारतीचे अध्यक्ष सतीश फाटक यांनी कळविले आहे हा