युवासेना आयोजित क्रिकेट स्पर्धेत सी फॉर इलेव्हन संघ विजेता——विजेत्या संघाला शिवसेना चषक तसेच 21 हजाराचे पारीतोषीक

प्रतिनिधी यवतमाळ:- युवासेनेच्या वतीने आयोजित शिवसेना चषक 2020 क्रिकेट सामन्यांचे आयोजन स्थानिक पोस्टल ग्राऊंड वर करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत सी फॉर इलेव्हन या क्रिकेट संघाने लाला इलेव्हन चा पराभव करीत बाजी मारली. विजेत्या संघाला 21 हजाराच्या रोख पारीतोषीकासह शिवसेना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक 27 डिसेंबर पासून पोस्टल ग्राऊंडवर या क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, शिवसेनेचे न्याय व विधी विभाग प्रमुख अभिजीत बायस्कर यांच्या हस्ते सामन्यांचे उदघाटन झाले. यवतमाळ जिल्हयातील 42 क्रिकेट चमुंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. टेनिस बॉल ने खेळल्या गेलेले हे सामने बघण्याकरीता यवतमाळकर नागरीकांनी सुध्दा पोस्टल ग्राऊंडवर गर्दी केली होती. प्रत्तेक चमुला 6 ओव्हर देऊन खेळविण्यात आले. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात यवतमाळच्या सी फॉर इलेव्हन या संघाने लाला इलेव्हन या संघाचा पराभव करुन शिवसेना चषक जिंकला. शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, अॅड. अभिजीत बायस्कर, लॉयन्स क्लब चे अध्यक्ष रवी तलरेजा, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल गणात्रा यांच्या हस्ते पारीतोषीक वितरण करण्यात आले. सी फॉर इलेव्हन संघाला शिवसेना चषक तसेच 21 हजाराचे रोख पारीतोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. व्दितीय पारीतोषीक 15 हजार रुपये रोख लाला इलेव्हन संघाला देण्यात आले. मॅन ऑफ द सीरीज गौरव शुक्ला, बेस्ट बॅट्समॅन निकुंज दत्तानी तसेच बेस्ट बॉलर म्हणून तुषार हेमाने यांना सन्मानित करण्यात आले. सामन्यांच्या यशस्वीतेसाठी विजय माळवी, दिपक जोशी, रोहीत राय, अक्षय खडसे यांनी परीश्रम घेतले. पंच म्हणून राजु टेंभरे, शौकत वसाणी, हेमंत देवबंसी यांनी काम पाहीले. कुमार चौधरी यांचे कॉटन सिटी क्रिकेट क्लब तसेच सह आयोजक रोहित राय यांचेही विशेष सहकार्य मिळाल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले.
युवकांच्या सेवेसाठी कटीबध्द
युवासेना युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे. विविध खेळांचे आयोजन करुन आम्ही तसा प्रयत्न करीत आहो. या आधीही विविध सांस्कृतिक, कला तसेच क्रिडा स्पर्धेंचे आयोजन करुन आम्ही युवकांच्या कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न पुढेही सुरुच ठेवणार आहो.