ई श्रम कार्ड नोंदणी शिबीराचा कामगांरानी घेतला लाभ

यवतमाळ शहर शिवसेनेचे आयोजन

यवतमाळ प्रतिनिधी :- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकारकडून सातत्याने अनेक पावले उचलली जात आहेत. अशा सर्व लोकांसाठी ई-श्रमिक कार्ड लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी योजनेपासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी ई श्रम नोंदणी शिबीराचे आयोजन केले. या शिबीरात शेकडो कामगांरानी नोंदणी करुन शिबीराचा लाभ घेतला.

सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्ट्रेशन ऑफ किंवा ऑनलाइन करता येणार आहे. प्रत्यक्षात बहुतांश कामगार हे शिक्षीत नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक जन अर्ज सुध्दा करीत नसल्याने ते विविध योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळेच पिंटु बांगर यांनी स्थानिक पिंपळगाव येथील लाल बहाद्दूर शास्त्री शाळेत ई श्रम नोंदणी शिबीराचे आयोजन करुन कामगारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दोन दिवसापासून सुरु झालेल्या या शिबीरात अनेकांनी नोंदणी केली असून अजुन तीन दिवस शिबीर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पिंटु बांगर यांनी दिली आहे. शिबीरात काही कारणाने नोंदणी न करु शकलेल्यांना सुध्दा ई-श्रम कार्डसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला नेऊन त्यांची नोंदणी करुन दिली जाणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी संजय काळे, विजय ठोके, संतोष मुंडरे, नीरज पेंदोरकर, अक्षय चव्हाण, अक्षय उयके, महेंद्र लुटे, मोसिन शेख, उज्वल तिडके, सावंन राठोड, राधे मदंकर, आकाश कोटनाके, कार्तिक लांजेवार, निखिल दांडेकर, भावेश बिजवे, सागर मेश्राम परीश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *