राष्ट्रीय ग्राहक दिनी टपाल तिकीट व विशेष कव्हर चे प्रकाशन
राष्ट्रीय ग्राहक दिनी टपाल तिकीट व विशेष कव्हर चे प्रकाशन
यवतमाळ प्रतिनिधी :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक हित जपणारी संघटना असून, ग्राहक हितार्थ चळवळीचे मजबूत संघटन आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 रोजी दिनांक 24 डिसेंबर 1986 ला अस्तित्वात आला. या अंतर्गत ग्राहकांवर अन्याय होणार नाही व त्यांच्या हिताचे, अधिकाराचे संरक्षण होईल या बाबत ची उपाययोजना कायद्याने अभिप्रेत केली आहे. या अंतर्गत ग्राहक हितार्थ चळवळीचे कार्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत यवतमाळ जिल्हा व तालुक्यात करीत आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली अस्तित्वात आल्यापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दीन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायत तर्फे पोस्टाच्या डाक तिकीट ‘माय स्टॅम्प व विशेष कव्हर’ चे प्रकाशन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांचे हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी जिल्हासंघटन मंत्री हितेश सेठ, शहराध्यक्ष ॲड. राजेश पोहरे शहरसचिव डॉ. शेखर बंड, शहर संघटनमंत्री राजेंद्र कठाळे, कोषाध्यक्ष विपुल पोबारु, चंद्रकांत गड्डमवार, प्रकाश चनेवार, मोहन कुळकर्णी, शरद मन्नरवार हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.