वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्माकारे यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत

मुख्य आरोपी अद्यापही मोकाट

उमरखेड प्रतिनिधी :-  ११ जानेवारी रोजी सांयकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान उमरखेड येथिल आर.पी . उत्तरवार कुटिर रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ.हनुमंत संताराम धर्माकारे यांची उमरखेड – पुसद रोडवर साकळे विदयालय समोर एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपी पोलीस पोलिसांनी जेरबंद आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की,सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलीस अधिक्षक , यवतमाळ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन घटनास्थळाची पाहणी केली.पोलीस स्टेशन उमरेखड , बिटरगाव , पोफाळी , दराटी यांचे प्रत्येकी एक एक पथक , स्थागुशा येथील चार पथके व सायबर सेलचे दोन पथक असे एकुण दहा पथके तयार करण्यात आली . सदर पथकांना योग्य ते मार्गदर्शन करुन जिल्हयातील व जिल्हयालगतच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या . स्थागुशा व सायबर सेल यांनी मृतक यांचा पुर्व इतिहास,कौटुंबिक कलह व आर्थिक वाद याची पडताळणी केली , घटनास्थळावरील तसेच उमरखेड शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना तपासण्याचे आदेश दिले होते.

वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्माकारे यांचा पुर्व इतिहास , कौटुंबिक पार्श्वभुमि व आर्थिक वाद यावरुन डॉक्टर यांचे मृत्यूस असे भक्कम कारण शोधण्याकरीता प्रयत्न करण्यात आले होते यामध्ये डॉ .हनुमंत धर्माकारे यांच्या वैद्यकिय सेवाकाळात घडलेल्या घटनांबाबत देखील सखोल माहिती प्राप्त करण्यात आली .

या दरम्यान ४ मे २०१९ चे रात्री दोनच्या सुमारास स्थानिक शिवाजी चौक येथे मोटार सायकलचा अपघात झाला होता , त्या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले.त्यादरम्यान जखमी याचा मृत्यू झाला , त्यावेळस आर .पी . उत्तरवार कुटिर रुग्णालय येथे डॉ.हनुमंत धर्माकारे हे कर्तव्यावर हजर होते

त्या अपघातात जखमी नामे शेख अरबाज शेख अब्रार याचा डॉ.हनुमंत धर्माकार यांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्य झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर त्यावेळी केला होता. त्यादरम्यान पोलीसांनी घटनेची शहानिशा करुन वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करुन प्रकरण हाताळले होते. त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ नामे ऐफाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी डॉक्टरांनसोबत हुज्जतबाजी करुन त्यांना  ठार जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सदर प्रकरणातील तांत्रिक बाबींचे बारकाईने विश्लेषन केले असता व या घटनेतील प्राप्त संशईतांचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेला संशईत इसम हा शेख ऐफाज शेख अब्रार याचे सारखा चहरेपट्टी व शरीरयष्टीचा दिसत असल्याने त्याबाबत गोपनिय माहितीवरून आरोपी नामे ऐफाज ऊर्फ अप्पु शेख अब्रार वय २२ वर्ष याने त्याचे मामा नामे सैय्यद तौसिफ सैय्यद खलील वय ३५ रा.ढाणकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टर यांना गोळ्या झाडुन त्यांना ठार मारुन ढाणकी येथून पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली .

सदर गोपनीय माहितीची व तांत्रिक बांबीची सांगड घालुन गुन्हयातील आरोपी नामे सैय्यद तौसिफ सैय्यद खलील वय ३५ वर्ष ,सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील वय ३२ वर्ष ,शेख मौहसिन शेख कय्युम वय ३४ वर्ष ,शेख शहारुख शेख आलम वय २७ वर्ष सर्व रा . ढाणकी यांना शिताफीने ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्यामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार वय २२ वर्ष याने डॉ. हनुमंत धर्माकारे यांचेवर पाळत ठेऊन त्यास घटनेच्या दिवशी गोळया झाडुन ठार केले व त्वरीत ढाणकी गाठले . गुन्हयात वापरलेली मोटर सायकल त्याने त्याचा ढाणकी येथील त्याचा मामा सैय्यद तौसिफ सैय्यद याच्या ताब्यात दिली व त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने ढाणकी येथुन पसार झाला .

शेख ऐफाज शेख अबरार याने आपला मृतक भाऊ शेख अरबाज ऊर्फ हड्डी शेख अब्रार यांच्या मृत्यूचा वचपा व बदला घेण्याच्या उददेशाने तसेच त्याच्या भावाच्या मृत्युचा डॉक्टर कडुन प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडून ठार मारल्याची हकीकत यावेळी पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी दिली .

सदर गुन्हयामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्हयातील मुख्य आरोपीस पसार करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन क्रं.एम एच ०४ डी एन ६२६३ हस्तगत करण्यात आले आहे . मुख्य मारेकरी हा फरार असुन त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत .

सदरच्या गुन्हयाचा उददेश याबाबत अधिक सखोल तपास करण्यात येत असुन या गुन्हयाच्या तपासामध्ये आणखी भादवी कलम १०९ , १२० ( ब ) , २१२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २७ तसेच अ.जा.ज.प्र.का. १९८९ चे कलम ३ , ( २ ) ( व्ही ) ची वाढ करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ.दिलीप भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली , अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे , उमरखेडचे उपविभागिय पोलीस अधिकारी , प्रदिप पाडवी , पोनि स्थागुशा प्रदिप परदेशी , ठाणेदार अमोल माळवे , ठाणेदार पोस्टे बिटरगाव , पोस्टे दराटी , प्रभारी अधिकारी सायबर सेल अमोल पुरी यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र मेहनत व परीश्रम घेतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले .

पोलिस अधीक्षकांनी केले बक्षीस जाहीर

11 जानेवारी रोजी घडलेल्या गंभीर , संवेदनशील व आव्हानात्मक गुन्हयाचा तपास ४८ तासात उघडकीस आणल्याबददल पोलीस अधिक्षक यांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना एक लाख रुपये रोख प्रोत्साहनपर जाहीर केले.

मुख्य आरोपी अद्याप मोकाटच

फक्त आरोपी डॉक्टर धर्मकार्य यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करणारा मुख्य आरोपी नामे शेख ऐफाज शेख अबरार वय २२ वर्ष हा अद्यापही फरार असून सदर आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल असे यावेळी जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *