गेल्या 24 तासात 288 पॉझिटिव्ह ; 246 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 288 पॉझिटिव्ह ; 246 कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1675 बेड उपलब्ध
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2112
यवतमाळ प्रतिनिधी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 288 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 2069 व बाहेर जिल्ह्यात 43 अशी एकूण 2112 झाली असून त्यातील 84 रूग्ण रूग्णालयात तर 2028 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 508 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 220 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76767 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72864 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 288 रूग्णांमध्ये 110 महिला व 178 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 27, बाभुळगाव चार, दारव्हा 43, दिग्रस पाच, घाटंजी एक, कळंब 12, महागाव तीन, नेर 13, पांढरकवडा 27, पुसद 10, राळेगाव 32, उमरखेड दोन, वणी चार, यवतमाळ 93 व इतर जिल्ह्यातील 12 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 14 हजार 882 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 38 हजार 43 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 56.69 आहे तर मृत्यूदर 2.33 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1675 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 94 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1675 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 91 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 696 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे .