हमालाचा दगडाने ठेचून खून आर्णी शहरातील घटना
आर्णी प्रतिनिधी:- अनाज बाजारात हमाली चा व्यवसाय करणाऱ्या दोन हमाला मध्ये हमालीच्या वादातून झालेल्या क्षुल्लक वादातून एकाने दुसऱ्या वर दगडाने ठेचून तसेच शेल्याने गळा आवळून खून केल्याची घटना आणि शहरात घडली आहे सय्यद रशीत सय्यद मुसा असे मृतकाचे नाव आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मृतक सय्यद रशीद सय्यद मुसा व आरोपी जावेद अली उर्फ कबूतर अली हे आर्णी शहरातील अनाज बाजारात हमाली करायचे,काल रात्री दरम्यान मृतक व आरोपींमध्ये हमाली करण यातून वाद झाला या वादातून जावेद अली उर्फ कबूतर किस्मत अली याने सय्यद रशीद सय्यद मुसा यांच्या छातीवर व डोक्याच्या मागच्या बाजूला दगडाने ठेचून तसेच शेला शेल्याने गळा आवळून खून केला मृतकाच्या मुलाने वडील रात्री घरी न आल्याने सर्वत्र शोध घेतला मात्र ते रात्री ते कुठे मिळून आले नाही. मात्र सकाळी जयस्वाल यांच्या देशी दारू च्या भट्टीजवळ मृत अवस्थेत सय्यद रशीद सय्यद मुसा हे पडून असल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलिस करीत आहे