यवतमाळातील ‘कॅफे’ प्रेमीयुगुलांच्या अय्याशीचा अड्डा अवधूतवाडी पोलिसांची धाड
अवधूतवाडी पोलिसांची धाड, दोन जोडपे सापडले
शहर प्रतिनिधी :- यवतमाळ येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात वनबीएचके’ मध्ये असलेल्या कॅफेत ५०० रुपये घंटाप्रमाणे प्रेमीयुगुलांना अय्याशीसाठी बेड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार राजेंद्र देविदास गुल्हाने राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या कॅफे चालकाचे नाव आहे. येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात कॅफे थाटण्यात आला होता.
या ठिकाणी बर्गर, सँडविच, आधी खाद्यपदार्थ विक्री केले जाते. येथे सर्वाधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीची गर्दी असते त्यामध्ये अधिकाधिक प्रेमीयुगुल असतात. प्रेमी युगुलांना निवांत जागाच अधिक आवडते. त्यामुळेच निर्जनस्थळी जाण्याचा अधिक कल त्यांचा असतो प्रेमी युगुलांची हीच गरज ओळखून अनेकांनी त्यांना बंदद्वार प्रेम करण्याची सुविधा देण्याच्या गोरखधंदा सुरू केला आहे. असाच प्रकार अनेक महिन्यापासून सुरू होता त्यासाठी वनबीएचके’ मध्ये ७ ते ११ बेड तयार करण्यात आले. एकांतातील प्रेम हवे असल्यास ५०० रुपये घंटा असा दरही ठरवून सेवा सुरू करण्यात आली होती. शिकवणी व कॉलेज वेळेत कैफे चालक आपल्या वनबीएचके’ मध्ये जोडप्यांना प्रवेश देत होता. गत अनेक महिन्यापासून हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. दरम्यान हा प्रकार अवधूत वाडी पोलीस स्टेशनला माहित झाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली.
यावेळी वनबीएचके’ मध्ये पोलिसांना दोन जोडपे आढळून आले. त्यांची चौकशी केल्यानंतर कॅफे चालकाचे नाव समोर आले आणि हा गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. या धाडीत पोलिसांनी दोन्ही जोडप्यांना सोडून दिले तर कॅफे चालकाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले होते. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून ताकीद दिल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.