दारुड्या पतीकडून विवाहितेची गळा आवळून हत्या आरोपी अटकेत
मोमीनपुरा येथे विवाहितेचा गळा आवळून खून दारूड्या पतीचा पराक्रम ; आरोपी अटकेत
तालुका प्रतिनिधी :- वसंतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोमीनपुरा येथे दारुड्या पतीने विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना दि.१४ जुलै राेजी उघडकीस आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरालगत असलेल्या मोमीनपुरा येथे रुबीना मुख्तार खान वय २८ वर्ष या विवाहितेचा तिचा पती मुख्तार खान सत्तार खान पठाण वय ३२ वर्ष रा. मोमीनपुरा याने पहाटेच्या दरम्यान गळा आवळून खून केला.
शेख सद्दाम शेख गफ्फार मयत विवाहितेचा भाऊ रा.सुकळी तालुका उमरखेड याने दिलेल्या फिर्यादीनुसार वसंत नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या आईसह ताब्यात घेतले. पोलिसांनी विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांना सुपूर्द करण्यात येणार आहे. सदरील आरोपी पती हा व्यसनाधीन असून व्यसनाच्या आहारी जाऊन सतत तो पत्नीला मारझोड व त्रास देत होता अशी चर्चा रुग्णालय परिसरात नातेवाईकांमध्ये सुरू होती. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर पीएसआय मातोंडकर यांच्यासह वसंतनगर पोलीस करीत आहेत.