२५ वर्षीय युवक तलावात मासे पकडण्यासाठी गेला अन् अचानक झाला बेपत्ता…
मारेगाव तालुक्यातील घटना
तालुका प्रतिनिधी :- बापुजी आत्राम (वय २५) असे बेपत्ता असलेल्या युवकांचे नावे असल्याचे पोलिस पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दि. १४ जुलै रोजी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास रामपुर येथे तलावात घडली.
नित्याप्रमाणे तलावात मासे पकडण्यासाठी गेलेले तिन युवक त्यापैकी एक युवक अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. तलावात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
अमोल टेकाम, (वय २५) अतुल मेश्राम (२०), बापूजी आत्राम (वय २४) हे तिन युवक मासे पकडण्यासाठी गेले होते त्यापैकी बापूजी आत्राम हा बेपत्ता युवकांचे नावे आहे. बेपत्ता युवकाचा शोध सुरू होता. त्यांच्या शोधाकरिता मारेगाव येथील चमूला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिस आणि महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.