पूस नदीत उडी घेऊन एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पूस नदीत उडी घेऊन एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहर प्रतिनिधी :- पुसद शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पुसद दिग्रस रोडवरील पुस नदीत एका अल्पवयीन मुलीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहेत.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार शहरातील नवल बाबा वॉर्ड परिसरात राहणारी प्रिती अजय जगदाड वय अंदाजे 17 वर्ष हिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी घरून निघून गेल्याची घटना घडल्याने आईने थेट शहर पोलीस स्टेशन गाठून मुलगी घरून निघून गेल्याची माहिती दिली दरम्यान दुपारी 1; 30 वाजता पुसद दिग्रस रोडवरील पुस नदीच्या पुलावरून मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला वाचण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि शेवटी मुलाचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. सदर मुलीस मेडिकेअर हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. परंतु तिने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळ वसंत नगर पोलीस स्टेशन असल्याने पुढील तपास वसंत नगर पोलीस करीत आहे.