अकोला बाजार जवळ भीषण अपघात : एक ठार तर, दोघे गंभीर जखमी
कार दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी
तालुका प्रतिनिधी :- अकोला बाजार यवतमाळ रोडवर लोणी फाट्यालगत दुचाकीची कारला धडक झाली . ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजताचे दरम्यान घडली. या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
आर्णी येथील भाजीपाला विक्रेता शेख आलताफ नामक हा युवक अकोला बाजार येथील आठवडी बाजारात भाजीपाला विकून यवतमाळ कडे आपल्या दोन मित्रासोबत परत जात असताना यवतमाळ येथून घाटंजी तालुक्यातील घोटी येथील प्रिन्स इलेक्ट्रॉनिक नाव लिहलेली कार इलेक्ट्रानिक वस्तू घेऊन येत असताना समोरासमोर धडक झाली.
अपघातातील मृतक व जखमींना ऍम्ब्युलन्स द्वारे शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. अद्याप मृतक व जखमींची नावे कळू शकली नाही. घटनेची माहिती होताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली.