परोपटे लेआउट वडगाव मधील रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ शहरालगत असलेल्या आर्णी मार्गावरील परोपटे लेआउट मध्ये जीवन प्राधिकरणामार्फत केलेल्या कामामुळे सध्या नागरिक हैराण झाले असून चांगला रस्ता फोडून जीवन प्राधिकरणने अमृत योजना राबवल्यामुळे ठीक ठिकाणी पडलेल्या मोठ्या मोठ्या भगदाडाने येथे दररोज अपघात घडत असून येथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे
काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे विलगीकरण नगरपरिषद मध्ये झाले. अशातच केंद्र सरकारने अमृत योजना यवतमाळ शहरा करिता आणली मात्र ही योजना शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे अशातचआर्णी मार्गावरील मोक्षधाम मागे तर जीवन प्राधिकरण अमृत योजनेचे काम करत असताना चक्क चांगला रस्ता फोडला आहे अशातच येथील रहिवाशांना येथून मार्गक्रमण करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशातच ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी याच्यामध्ये साचत आहे त्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे मोठे आजार येथील नागरिकांना होण्याची दाट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे येथील रहिवाशांनी जीवन प्राधिकरणावर व नगरपरिषद यवतमाळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे हे रस्ते तात्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी हिरालाल राठोड,बजरंग प्रसाद शर्मा, गणेश निनावे,निलेश जाधव, प्रशांत चावरे,संजय मनवंर,जयवंत चावरे, रवी तडसे,चंद्रकांत मेश्राम,डॉ.अजय येलगंधेवार,रवींद्र दारुडकर, पूजारामजी हुबे,चंद्रशेखर फटिंग, अमित रामटेके,अंकित नवले आदींनी केली आहे
चांगला रस्ता जीवन प्राधिकरणाने फोडला त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे किरकोळ अपघात परोपटे लेआउट मध्ये नेहमीच होतात या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेचे काम करीत असताना परोपटे लेआउट मधील चांगला रस्ता फोडला ठीक ठिकाणी मोठे भगदाड पडल्याने पावसाचे पाणी यामध्ये साचते या पाण्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.