बोरी इचोड गावाजवळ भरधाव दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात,दुचाकीस्वार गंभीर जखमी
युवक गंभीर जखमी
राळेगाव प्रतिनिधी :- भरधाव दुचाकी स्लिप होऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि 6 ऑगष्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरी इचोड गावाजवळ घडली,
धर्मेंद्र अशोक मोहबे वय 30 वर्ष रा बोरगाव असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र हा त्याची दुचाकी क्र एम एच 31 एफ के 4422 ने नागपूर कडून पांढरकवडा येथे जात होता. यावेळी ते बोरी इचोड गावळजवलील असलेल्या उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर त्यांचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली कोसळला. यात ते गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला व हाता पायाला जबर मारला लागला असून त्याला डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे बिट जमादार अरुण भोयर सह किरण दासरवर हे दाखल होऊन या घटनेचा पुढील तपास करीत आहे,