महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा वडकी येथून प्रारंभ
पदाधिकारी कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसले.भर पावसात काँग्रेस कर्त्यांनी नारे लावत या पदयात्रेला सुरुवात केली
तालुका प्रतिनिधी :- देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ९ ऑगस्ट 2022 रोजी क्रांतीदिनी पदयात्रेचा प्रारंभ होत असून १४ तारखेला या पदयात्रेचा समारोप होत आहे.महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष माणिकरावजी ठाकरे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल मानकर,माजी शिक्षनमंत्री प्रा,वसंतराव पुरके,प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत आज राळेगाव तालुक्यातील वडकी येथील राळेगाव चौफुलीवर असलेल्या उड्डाणपूलाखाली या आझादीका गौरव पदयात्रेला सुरुवात करण्यात आली,
जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या पदयात्रेत राळेगाव मतदार संघातील काँग्रेसचे अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसले.भर पावसात काँग्रेस कर्त्यांनी नारे लावत या पदयात्रेला सुरुवात केली