श्री दिगंबर जैन मंदिर माळीपुरा तर्फे श्री 1008 भगवान महावीर निर्वाणोत्सव-2022 साजरा
यवतमाळ :- संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, जियो और जिने दो मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान बनता है, असे मानव कल्याणासाठी संदेश देणारे जैन धर्माचे चोविसवे तिर्थंकर श्री 1008 भगवान महावीर यांचे निर्वाण कार्तिक कृष्ण अमावस्येला झाले.
त्यानुसार यावर्षी 25 ऑक्टोबर रोजी श्री दिगंबर जैन मंदिर, माळीपुरा, यवतमाळ येथे भव्य प्रमाणात सर्व जैन श्रावक-श्राविकांनी महावीर निर्वाणोत्सव अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला. या प्रसंगी भगवान महावीरांना भव्य निर्वाण लाडू चढविण्यात आला.
अजिंक्य अशोक जूननकर परिवार व प्रवीण मनोहरराव पंडित परिवार हे मंदिर तर्फे भगवान महावीरांना प्रथम निर्वाण लाडू चढविण्याचा मान प्राप्त करणारे पूण्यार्जक लाभले.
यावेळी अतुल गोंधळे यांनी पावापुरी जलमंदीराचा देखावा तयार केला तर निर्वाण लाडू बनविण्याकरीता अलका अशोक रोहणे यांचे सहकार्य लाभले. मोठ्या प्रमाणात जैन श्रावक-श्राविकांनी निर्वाण लाडू चढवून भगवान महावीर निर्वाणोत्सव अति आनंदाने व उत्साहाने साजरा केला.
या प्रसंगी निता गोंधळे, वैशाली टोपरे, वृषाली गव्हाणे, सचिन नखाते, राजु इंदाने यांचे सहकार्य लाभले. भगवान महावीर निर्वाणोत्सव यशस्वी करण्याकरीता मंदिरचे अध्यक्ष अशोक रोहणे व सचिव नंदकुमार बदनोरे यांनी अथक परिश्रम घेतले तसेच विजय काळे, दिपक टोपरे, प्रदिप कहाते, शोभाताई पंडित यांनी सहकार्य दिले.