शिवसेनेचा दीपावली स्नेहमिलन सोहळा उत्साहात*

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती
यवतमाळ:- शिवसेनेचा दीपावली स्नेहमीलन सोहळा स्थानिक बाळकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.सदर मेळाव्याला जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.लॉकडाऊन नंतर प्रथमच जिल्ह्यातील सर्व शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी एकत्र आले.कार्यक्रमामध्ये मंचावर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री संजय राठोड,जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा कलिंदी पवार,यवतमाळ शहराच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी,माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार,जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर,राजेंद्र गायकवाड,पराग पिंगळे,जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड,जिल्हा परिषद सभापती विजय राठोड,नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल,महिला आघाडी जिल्हा संघटिका लता चंदेल,जिल्हा संघटिका निर्मला विनकरे,जिल्हा संघटिका मंदा गाडेकर,घाटंजी नगर पालिका नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन बेजंकिवार,जेष्ठ मार्गदर्शक परमानंद अग्रवाल,रामराव नरवाडे,नामदेवराव खोब्रागडे,सलीम खेतानी,साजिद शरीफ उपस्थित होते.संचालन पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन बेजांकिवार यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी केले.कार्यक्रमात माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार,नगराध्यक्षा सौ कांचन चौधरी,जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा पवार,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व ना संजय राठोड यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना प्रणित विविध आघाड्यांची स्थापना
ह्या कार्यक्रमात शिवसेना प्रणित विविध आघाड्यांची प्रथमच स्थापना करण्यात आली.राळेगाव,यवतमाळ,दिग्रस,पुसद आणि उमरखेड विधान सभेकरिता शैलेश गाडेकर जिल्हा संघटक वाहतूक सेना, प्रवीण निमोदिया जिल्हा संघटक व्यापारी आघाडी,प्रशांत पत्तेवार जिल्हा संघटक व्यापारी आघाडी,ऍड अभिजित बायस्कर जिल्हा संघटक विधी व न्याय विभाग,गोविंद कट्यारमल जिल्हा संघटक निवृत्त नोकरदार सेना,भरत मसराम जिल्हा संघटक आदीवासी आघाडी,अशोक पुरी जिल्हा संघटक शेतकरी व शेतमजूर सेना, अनिल यादव जिल्हा संघटक हिंदी भाषिक व उत्तर भारतीय आघाडी,सचिन राठोड जिल्हा संघटक विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडी,राजेंद्र गिरी जिल्हा संघटक सहकार सेना, रुपेश सरडे जिल्हा संघटक ऑटो रिक्षा चालक मालक सेना, संजय कांबळे जिल्हा संघटक भीमशक्ती आघाडी,प्रा राजेश चव्हाण जिल्हा संघटक शिक्षक आघाडी यांची नियुक्ती करण्यात आली.शिवसेना वणी व आर्णी विधानसभेकरिता हिमांशू बत्रा जिल्हा संघटक व्यापारी आघाडी,ऍड दुष्यंत बोरूले जिल्हा संघटक विधी व न्याय विभाग,विजय गेडाम जिल्हा संघटक आदिवासी आघाडी,रितेश लखमापुरे जिल्हा संघटक शेतकरी व शेतमजूर सेना,अरविंद गारघाटे उपजिल्हा संघटक शेतकरी व शेतमजूर सेना, नरेंद्र ताजणे जिल्हा संघटक सोशल मीडिया सेल,विरु प्रसाद जिल्हा संघटक हिंदी भाषिक व उत्तर भारतीय आघाडी,प्रमोद मिलमिले सहकार सेना,गणेश सोनूले जिल्हा संघटक ओ.बी.सी आघाडी,सुरेश पारखी उपजिल्हा संघटक भीमशक्ती आघाडी,विनोद उप्परवर जिल्हा संघटक वाहतूक सेना,देविदास कोल्हे जिल्हा संघटक माजी सैनिक संघटना,डॉ मनीष मस्की जिल्हा संघटक डॉक्टर सेल यांना ना संजय राठोड यांचे हस्ते मानाचा भगवा शेला व नियुक्तीपत्र देण्यात आले.ह्याच बरोबर दीपक उमरे यांना यवतमाळ विधानसभा संघटक आदिवासी आघाडी,दशरथ शेजुळकर यांना शहर संघटक भीमशक्ती आघाडी पदी नियुक्ती देण्यात आली.बोरी जिल्हा परिषद सर्कल( यवतमाळ विधानसभा भाग) उपतालुका प्रमुख पदी डॉ अनिल नाईक यांना तर बोरी शहर प्रमुख पदी रवी जाधव यांना नियुक्ती देण्यात आली.ह्या सर्व नियुक्त्या प्रभारी पदी करण्यात आल्या असून पदाधिकाऱ्यांचे कार्य बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवसेना यवतमाळ जिल्हा समन्वय समितीची घोषणा
पालकमंत्री यांचे अधिकारात होणाऱ्या विविध समित्या गठीत करणे,येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत,नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीत पक्षाची दिशा ठरवणे,शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवार निवड ह्या सारख्या कामामध्ये निर्णय घेण्यासाठी शिवसेना यवतमाळ जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.नामदार संजय राठोड हे ह्या समितीचे प्रमुख असून खासदार भावना गवळी,खासदार हेमंत पाटील,आमदार दुष्यंत चतुर्वेदी,जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा पवार,सौ कांचन चौधरी,माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विश्वास नांदेकर,राजेंद्र गायकवाड,पराग पिंगळे,प्रवीण पांडे,श्रीधर मोहोड,बाळासाहेब चौधरी, गजानन डोमाळे,किशोर इंगळे,संजय रंगे,निर्मला विनकरे,मंदाताई गाडेकर,लताताई चंदेल,सागरताई पुरी,गजानन बेजांकिवार,नामदेवराव खोब्रागडे,सलीम खेतानी,शैलेश ठाकूर,पवन जयस्वाल,बाबू पाटील जैत,परमानंद अग्रवाल व दीपक कोकास यांचा ह्या समिती मध्ये समावेश आहे.ना संजय राठोड यांचे हस्ते भगवा शेला परिधान करून जिल्हा समन्वय समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
नगर पंचायत निवडणुकी करीता निरीक्षक घोषित
येत्या नगर पंचायत निवडणुका पाहू जाता शिवसेनेतर्फे निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. बाभूळगाव नगर पंचायत करिता उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,भाऊराव ढवळे,मनोज नाल्हे, कळंब नगर पंचायत करिता किशोर इंगळे,संजय रंगे व योगेश वर्मा, राळेगाव नगर पंचायत करिता हरिहर लिंगनवार,गजानन पाटील,अमोल धोपेकर,महागाव नगर पंचायत करिता प्रवीण शिंदे,राजू साखला,उत्तम ठवकर,झरी नगर पंचायत करिता गणपत लेडांगे,जयंत बंडेवार, मधुकर वरटकर तर मारेगाव नगर पंचायत करीता गजानन बेजांकिवार,साजिद शरीफ,विक्रांत चचडा व शरद ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमात जिल्ह्यातून आलेल्या उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख,उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख व लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगर पालिका सदस्यांना व शिवसेनेतील मान्यवरांना दीपावली निमित्य भेटवस्तू शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातर्फे देण्यात आली.विविध शासकीय समित्यांवर नियुक्ती करिता शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातर्फे इच्छुक उपस्थितांकडून वैयक्तिक माहितीचे अर्ज भरून घेण्यात आले.सर्व शासकीय समित्यांची नेमणूक महिन्याभरात करण्याचा मनोदय ह्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुखांनी बोलून दाखविला.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता गजानन डोमाळे,संजय निखाडे,किशोर इंगळे,संजय रंगे,मनोज सिंगी,उत्तम ठवकर,मनोज नाल्हे,ऍड बळीराम मुटकुळे,सतीश नाईक,प्रमोद भरवाडे,राजू राठोड,संदीप ठाकरे,राजू दुधे,दीपक आडे,विनोद काकडे,वसंत जाधव,दिगंबर मस्के,निलेश मैत्रे,विक्रम बुऱ्हाणपूरे,विनोद काकडे,राकेश राऊळकर,दीपक काळे,उमाकांत पापीनववार, राजेंद्र साकला,रवी राठोड,प्रवीण शिंदे,मनोज ढगले,जयंत बंडेवार, संजय आवारी,निलेश चव्हाण,पंकज शिवरामवार,सुधीर थेरे,राजू तुरणकर,चंद्रकांत घुगुल,विक्रांत चाचडा,रवी बोढेकर,विशाल गणात्रा, रवी बोचरे यांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.स्थानिक पातळीवरील नियोजनाचे काम जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे नेतृत्वात अमोल धोपेकर,योगेश भांदक्कर,श्याम थोरात,राजू राऊत,राहुल गंभिरे,निलेश बेलोकर,शैलेंद्र तांबे,प्रसाद अवसरे,गोलू जोमदे,बबलू शहा,अभय क्षीरसागर,राजेंद्र कोहरे,अभिनव वाडगुरे यांनी केले.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सर्वत्र भगवा फडकविणार
महाविकास आघाडीचे सरकार समाजातील सर्वच घटकांसाठी चांगले काम करीत आहे.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात कुटुंबप्रमुखांची भूमिका वठवीत आहेत.जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधानी आहे.त्यामुळे शिवसेनेकडे जनतेचा ओढा वाढला आहे.येत्या वर्षभरात होणाऱ्या नगर पंचायत,नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्याचा माझा व जिल्ह्यातील सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांचा व शिवसैनिकांचा मानस आहे.