करणार दिवाळी साजरी, गुरुदेव युवा संघाच्या प्रयत्नाला यश

यवतमाळ:
नगरपरिषदे द्वारे दिव्यांगांना मानधन देण्यात येते मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरी यवतमाळ नगर परिषद दिव्यांगांना मानधन देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे गुरूदेव युवा संघाच्या नेतृत्वा विविध आंदोलन करण्यात आले. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.
करीत असल्याचा आरोप गुरुदेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, जिल्ह्यात 744 दिव्यांग आहे मात्र अनेक कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे 596 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नगर परिषदच्या संबंधित विभाग कडुन दिव्यांगाच्या सहा महिण्यापासुन रखडलेल्या मानधनाचे 17.25 लाख रुपए 535 जुने व 61 नविन अश्या 596 लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. दिव्यांगाना प्रति माह 500 रुपए या प्रमाणे सहा महिण्याचे मिळूण 3 हजार रुपए प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे आता दिवाळी साजरी होणार आहे.
गुरूदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या प्रयत्नाला दिव्यांग लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले आहे. दिवाळीपूर्वी दिव्यांगांचे सहा महिण्याचे मानधन जमा झाले, आता दिव्यांगसुद्धा दिवाळी साजरी करणार आहे.