शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा मराठा आरक्षणासाठी दिला राजीनामा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे अशातच अनेक गावांमध्ये नेते मंत्री आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आली अशातच आता शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला असून मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केंद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली त्यांच्या या मागणीला तात्काळ खासदार हेमंत पाटील यांनी प्रतिसाद देत हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटरहेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला आहे
त्यांच्या या राजीनाम्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे