October 30, 2024

एका रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

यवतमाळ : शेतकऱ्यांचे हित जपणारे हे सरकार आहे. राज्य सरकारने 1 रुपये पीक विमा योजना लागू केली आहे. पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी यवतमाळच्या किन्ही मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरीकांना संबोधित केले.

 एक काळ असा होता की सहा सहा महिने उलटूनही शासकीय कामे होत. नव्हती परंतू आता काळ बदलला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे तातडीने मार्गी लावण्याचे काम सरकार करत आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली जात आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जात आहे.

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 21 हजार शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 75 हजार मॉडेल शाळांनाही मान्यता देण्यात आली.

शिक्षकांच्या रिक्त पदांवर मानधन तत्वावर नियुक्त्या करण्यात आल्या.

बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयासाठी 50 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, त्यावरही सकारात्मक विचार केला जाईल.

 

समृद्धी महामार्ग यवतमाळ जिल्ह्याला जोडला जाणार आहे. सुपर स्पेशालिटी आणि ट्रॉमा केअरसाठी सर्व आवश्यक पदे भरण्यात येणार आहेत. भरण्यासाठी त्याला मान्यता दिली जाईल. दीड लाख रुपयांची महात्मा फुले आरोग्य योजना आता पाच लाखांवर आणली आहे.

 

एमआयडीसीमध्ये व्ही तारा कंपनीची स्थापना होत आहे. ही कंपनी येथे 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीत जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे.

35 सिंचन प्रकल्प मंजूर
गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्पांचे काम रखडले होते. शासनाने 35 सिंचन प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

जलयुक्त शिवार योजनेलाही पुन्हा गती दिली जात आहे. बहुतांश शेतजमीन सिंचन क्षेत्रात आणण्याचे काम सुरू आहे.
नवीन उद्योगांना प्राधान्य
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार राज्यात नवीन उद्योगांना चालना देत आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी राज्य रोजगार देण्यामध्ये मागे पडले होते. मात्र आता राज्य सरकार नवीन उद्योगांना चालना देत आहे. हे सरकार आल्यानंतर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. 67 हजार तरुणांना व्यवसायासाठी 5 हजार कोटींहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.

देशाच्या पंतप्रधानांचे आभार
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी केलेल्या सर्व सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यकाळात विकासकामांना गती मिळाली आहे.

मराठा आरक्षण टिकेल
मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर चौकटीतच निर्णय दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा आरक्षण टिकून राहावे यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे मराठा बांधवांनी संयम बाळगावा. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed