यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा रूपया पेक्षा कमी मिळाली नुकसान भरपाई
जिल्ह्यातील 78 शेतकऱ्यांना विमा कंपनीने दिली पाच रूपयांपेक्षा कमी मदत
विमा कंपणीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आला पुढे
यवतमाळ :- दिवाळीपूर्वी विमा कंपनीने 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटीची विमा रक्कम जाहीर केली. या मदत यादीतील 9 हजार 727 शेतकऱ्यांना एक हजार रुपयाची ही मदत हातात पडली नाही. यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात तीन, पाच आणि दहा रुपयांची मदत गोळा झाल्याची बाब पुढे आली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे,पाचशे, हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार मदत यादीतून समोर आलाय. 9727 शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये पेक्षा कमी रक्कम गोळा झाल्याची बाब विमा कंपनीच्या मदत यादीतून पुढे आली आहे.