वणी-मारेगाव-कोरंबी परिसरात वाघाची दहशत
वणी:- तालुक्यातील रासा, बोर्डा, सुकलेगाव, कोरंबी, मारेगाव व मोहली सह लगतच्या गावात वाघाची दहशत पसरली आहे. येथील शेतकरी व शेतमजुरांनी शेतासह कामावर जाणे बंद केले आहे. मजुरी सुटल्याने गंभीर अवस्था मजुराची झाली. वनविभागाच्या वतीने कॅमेरा आदी सुविधा अजून नाहीच तर परिसरात अफवेला पेव फुटला असून जो तो वाघ आल्याचे बोलतो. याबाबत वनविभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे. वणी तालुक्याच्या लगत एकीकडे टिटेवरचे जंगल तर दुसरीकडे ताडोबाचे जंगल आहे. यामुळे जंगलातील प्राणी भटकत या परिसरात नेहमी आढळून येतात. कधी पिल्यांना जन्म देण्याकरिता वाघीण येत तर काही आपल्या क्षेत्राकरिता झालेल्या झुंझेमुळे पळ काढीत वाघ व इतर प्राणी या परीसरात येतात. यामुळे मानवी जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे याबाबत वनविभागाकडे तातडीने उपाय करत असल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे सध्या कपाशीच्या लागवडीकडे शेतकरी व मजूर समुहानेच शेतात जात आहे. या परिसरात वन विभागाकडून कॅमेरा आदी वाघाचे उपाय करण्यात येत नसल्याने झाल्याने वन विभागावर रोष दिसून येत मजुरीकरिता आहे. गत वर्षी वणी परिसरात वाघाचे आगमण झाल्याने वन विभागाला आपल्याकडे तातडीच्या उपाय करण्यासाठी साहीत्य उपलब्द करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे