परोपटे लेआउट मध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर
यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील मोक्षधाम मागील परोपटेल मध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी हे रस्त्यावर वाहत असून नागरिकांना याच सांडपाण्यातून वाहतूक करावी लागत आहे
काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे हस्तांतरण नगरपालिकेत झाले अशातच नगरपालिकेत ग्रामपंचायत झालेल्या प्रभागाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील मोक्षधाम मागील परोपटे लेआउट मध्ये नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे येथे रस्ता नाही सर्वत्र चिखल तसेच नाल्या नसल्याने नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर वाहताना दिसत असून या सांडपाण्यातूनच नागरिकांना वाहतूक करावी लागत आहे.
अशातच या परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच या भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असून डेंगू सारखे आजार येथील नागरिकांना होण्याची भीती वाढली आहे अशातच या भागात मोठमोठाले साप असल्याची चर्चा सुद्धा या परिसरात आहे या परिसरात राष्ट्रीय व पक्क्या नाल्या व साफसफाई नगरपालिका प्रशासनाने करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.