दिग्रस पोलीस ठाण्याच्या आवारात पत्रकार वर भ्याड हल्ला, पोलिसांची बघ्याची भुमिका.
दिग्रस पोलीस ठाणे बनले गुन्हा बर्किंगचा अड्डा,चक्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्रकारावर हल्ला.
दिग्रस पोलीस ठाण्यात पत्रकारच भ्याड हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भुमिका का घेतली ही बाब संशयास्पद
न्याय मिळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांना पत्रकारांचे निवेदन.
तालुका प्रतिनिधी :- दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये काल 30 नोव्हेंबर रोजी प्लॉट चे वादातून दोन गटातील 50 ते 60 नागरिकानी गर्दी केली असता त्याच घटनेची माहिती घेण्याकरिता पत्रकार धर्मराज गायकवाड तेथे गेले असता गैरर्जदार बबलू शेख रा. बाराभाई मोहल्ला दिग्रस हे तेथे हजर होते. त्यांनी पत्रकार गायकवाड यांना शिवीगाळ करून कॉलर पकडून मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याच घटनेची तक्रार दिग्रस पोलीस स्टेशनला दिली असता जो गुन्हा दाखल करावयास पाहिजे होता तो न करताच दुसराच गुन्हा दाखल केला असून घटना पोलीस स्टेशनचे आवारात घडली असताना पोलीस स्टेशनचे बाहेर दाखविली गेली तक्रारी नुसार व पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत गुन्हा दाखल करावा आशयांचे निवेदन दिग्रस पत्रकारांनी तहसीलदार दिग्रस यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदनातून केली आहे. ॲट्रॉसिटी सारखा संवेदनशील गुन्हा दडपला गेला असून जो गुन्हा दाखल करावयास पाहिजे होता तो दाखल न करता दिग्रस ठाणेदारांनी गुन्हा बर्किंग केला असून याचि सखोल चौकशी गैरर्जदारावर कार्यवाही करून पत्रकारास न्याय देण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व दिग्रसचे तहसिलदार धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी पत्रकार अजीम खान, प्रफुल व्यवहारे, विलास निकम, सुनील हिरास,लक्ष्मण टेकाळे, पुरुषोत्तम कुडवे,साजित पटलेवाले,सुरेश चिरडे, अफजल खान, पी. पी. पप्पूवाले, जय राठोड, आजीस शेख, हनुमान रामावत, झूबेर खा,सैय्यद सोयब, सदानंद जाधव, अजित महिंद्रे, धर्मराज गायकवाड, आमीन कलरवाले, कपिल इंगोले, मझंहर अहेमद खा, प्रशांत झोड,उमेश भटकर हजर होते.