वडगाव वीज वितरण उपकेंद्राचा भोंगळ कारभार,अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष मोठ्या अपघाताची शक्यता.
वडगाव ते 33 केवी उपकेंद्राचा भोंगळ कारभार
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष,मोठ्या अपघाताची शक्यता
शहर प्रतिनिधी:- यवतमाळ शहरालगत असलेल्या वडगाव ते 33 केवी उपकेंद्र वीज वितरण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या हद्दीत अनेक विद्युत रोहित्र हे उघडे असून या उघड्या विद्युत रोहित्रा मुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच वडगाव येथील वीज वितरण उपकेंद्र मधील अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
वीज वितरण कार्यालयातील वडगाव येथील 33 केवी उपकेंद्र हे गेल्या अनेक दिवसांपासून नेहमीच चर्चेत आहे अशातच काही दिवसांपूर्वी या उपकेंद्रातील एका अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाने लाज घेताना रंगेहात पकडले. अशातच वडगाव हद्दीतील अनेक घरांवरून उघडे विद्युत तार सुद्धा आहे अशातच आता नागपूर तुळजापूर मार्गावरील काही विद्युत रोहित्र उघडे असल्याचं दिसून येत आहे, अशातच या उघड्या रोहित्रारांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.