शिक्षक भारतीचा उमेदवार ताकतीने निवडून आना—-प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कपिल पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी यवतमाळ:- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक भारतीचे उमेदवार दिलीप निंभोरकर यांना कसोशिने तसेच ताकतीने निवडून आना. शिक्षकांचे सर्वच प्रश्न आम्ही मार्गी लाऊ असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यवतमाळच्या आर्णी रोडवरील आर्णी नाका येथील हनुमान मंदीर समोरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक भारतीच्या प्रत्तेक कार्यकर्त्याने फक्त शंभर मते जरी ओढून आनली तरी शिक्षक भारतीचा उमेदवार मोठया फरकाने निवडून येईल. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक भारतीच्या उमेदवाराला कसोशिने तसेच ताकतीने निवडून आनण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले.
उमेदवाराला निर्णायक मते देऊन आमदार बनविल्यास शिक्षकांची शंभर टक्के पगार देण्याची मागणी शंभर दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन सुध्दा त्यांनी दिले. गेल्या पंधरा वर्षापासून अनेक विना अनुदानीत शाळेचे शिक्षक पुर्ण पगाराची मागणी करीत आहे. सरकार मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहे. इतक्या वर्षानंतर शाळांना विस टक्के अनुदान मंजुर झाल्याने शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याला सुरुवात झाली आहे. ही मागणी आम्ही रेटून धरली असून शिक्षकांना शंभर टक्के पगार दिल्याशिवाय स्वस्त बसनार नसल्याचे सुध्दा त्यांनी सांगीतले. आघाडीचे उमेदवार शिक्षकांच्या मागणीसाठी कधीच आक्रमक होतांना दिसून आले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मागणीसाठी आक्रमक होणारा तसेच शिक्षकांची बाजु ताकतीने मांडणारा शिक्षक भारतीचा उमेदवार विधान परीषदेत पाठविण्याचे आवाहन शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी दिलीप निंभोरकर, अतुल देशमुख राष्ट्र सेवादल राष्ट्रीय सचिव, सुभाष मोरे कार्याध्यक्ष शिक्षक भारती, संदीप तडस राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, साहेबराव पवार जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती, पुरुषोत्तम ठोकळ विभागीय अध्यक्ष (प्राथमिक), धम्मा कांबळे प्रजासत्ताक शिक्षक संघ, संजय गुजर प्रजासत्ताक जिल्हाध्यक्ष, सुभाष गवई प्रजासत्ताक शिक्षक संघ नेते, विवेक ढेरे, गजानन पवार, संजय म्हस्के, राजेन्द्र जोगमोडे, प्रकाश साबळे, नंदलाल राठोड उपस्थित होते