जुनी पेंशन योजनांच्या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा- यवतमाळ सरकारी, निमसरकारी, जिल्हापरिषद शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना वाहनचालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांचे आज गुरुवार दि.१४ डिसेंबर पासून पेन्शन मागणीसाठी बेमुदत संप दिग्रस तहसिल समोर पुकारला असून काम बंद आंदोलनाचे हत्यार वापरल्याने नागरिकांच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहे.
या बेमुदत संपातील प्रमुख मागण्या, नविन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सर्वांना लागु करा, कंत्राटीकरण रद्द करून सद्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, सर्व क्षेत्रातील व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अनुकंपा नियुक्त्या विनाअट करण्यात याव्या, वाहनचालक व चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरती वरील बंदी उठविण्यात यावी. तसेच वारस हक्क मंजुर करण्यात यावा, शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे खाजगीकरण (कार्पोरेट धार्जीणे) रद्द करा, नविन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्यात यावा, पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतनतृटी दुर करण्यासाठी यंत्रणा स्थापन करा, सेवानिवृत्तीचे वय ६० करण्यात यावे, सेवानिवृत्त वर्ग – ४ च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. या मागण्यासाठी दिग्रस तहसिल आवारात काम बंद आंदोलन पुकारले असून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.