दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केली अटक चोरट्यांनकडून १२ दुचाकी जप्त
आर्णी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीतील १२ दुचाकी जप्त केल्या. आर्णीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधूनही हे आरोपी दुचाकी चोरीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सचिन नामदेव कवडे (३०) रा. पांगरी ता. आर्णी, लखन किसन राठोड (२६) रा. म्हसोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पाळत ठेऊन आर्णी पोलिसांनी शिताफिने अटक केली. या आरोपींनी दारव्हा, यवतमाळ, आर्णी यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दुचाकी चोरी केली. पोलिसांनी तब्बल पाच लाख ७५ हजारांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून जप्त केलेल्या काही दुचाकींचे मालक कोण हे निश्चित झाले नाही. आता त्यांचा शोध घेतला जात आहे.