आंतरराष्ट्रीय नृत्य कला स्पर्धा मध्ये भाऊसाहेब देवराव पाटील शाळेची गार्वी जांभुळे द्वितीय
Yavatmal:- लोकमाता शिक्षण प्रसारक संस्थेद्वारा संचालित कै.खा. भाऊसाहेब देवराव पाटील उच्च प्राथमिक शाळा वडगाव रोड यवतमाळ या शाळेतील वर्ग पहिलीची विद्यार्थिनी कु. गार्वी भूषण जांभुळे व डान्स शिक्षिका कु. हर्षदा परांडकर हिने अखिल नटराज अंतर सांस्कृतिक संघ नागपूर द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन डबल डान्स प्रकार मध्ये पारंपारिक भारतीय गोंधळ हा नृत्य प्रकार सादर केला होता त्यामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या यशाचे श्रेय ती तिच्या आई-वडील व शिक्षक वृंद यांना देते सदर देशाबद्दल शाळेची सचिव अनिल गायकवाड, अश्विनी गायकवाड
शाळेचे मुख्याध्यापक देवराव फटिंग व सर्व शिक्षक वृंदांनी कौतुक केलेले आहे.