अध्ययन प्रक्रीयेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षणाचा समारोप
समारोपीय कार्यक्रमात डॉ.शितल वातीले यांचा सपत्नीक सत्कार…
शिक्षण क्षेत्रातील नविन संकल्पना स्विकारणे गरजेचे – डॉ.शितल वातीले
यवतमाळ-
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ तथा गटसंसाधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचे आयोजन दि.18 मार्च ते 22 मार्च पर्यंत जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, आर्णी रोड, यवतमाळ येथे करण्यात आले होते. वर्ग 1 ते 5 व वर्ग 6 ते 8 पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या खाजगी, न.प. व जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा समावेश होता. एकुण सहा टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. तालुक्यातील 966 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. दि.22 मार्च ला या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत गावंडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ.शितल वातीले, प्राचार्य भांबेरे, गटशिक्षणाधिकारी पप्पु पाटील भोयर, प्रा.सागर राऊत, तालुका समन्वयक तथा सुलभक वैशाली गायकवाड यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये अधिक गतीने शिकण्याची प्रेरणा निर्माण करु शकतील व एकविसाव्या शतकातील मुलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होवू शकतील यासाठी या अध्ययन पक्रीयेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.शितल वातीले व शिक्षिका ज्योतीताई वातीले यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.शितल वातीले यांनी शिक्षण क्षेत्रातील नविन संकल्पना स्विकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कठीण परिश्रमातुन माणूस घडतो व माणसाजवळ अफाट कल्पनाशक्ती असेल तर शुन्यातुन साम्राज्य निर्माण करु शकतो म्हणून खचून न जाता प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.राजहंस मेंढे यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध उल्लेखनिय लेखन करुन विविध उपक्रमांना उजाळा दिला याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तज्ञ सुलभक वैशाली गायकवाड, प्रभाकर खोडे, अमित गावंडे, दिपलक्ष्मी ठाकरे, रोहीत निलावार, माधुरी दिंडोरकर, अर्चना वासेकर, भावना राऊत, अच्युत उरडवार यांनाही प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तर प्रशिक्षणार्थी तर्फे अशोक राऊत, अनिल चुटे, शालीनी परचाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे व गटशिक्षणाधिकारी पप्पु पाटील भोयर यांनी समयोचित विचार व्यक्त केले. या प्रसंगी जया गणवीर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील फुलमाळी, शितल सत्तुरवार, मुख्याध्यापिका सौ.पंचभाई, केंद्र प्रमुख राजेंद्र मेनकुदळे, इशान हांडे, निर्मला खडसे, जयश्री मदने, निळकंठ कुळसंगे, कल्पना मादेश्वार, महेश जनबंधु आदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचलन कविता मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक वैशाली गायकवाड यांनी मानले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.