पत्नीचा खून करणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर मधून केली अटक

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई
यवतमाळ/ पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीवर गंभीर हल्ला चढविला या हल्ल्यात पत्नी जखमी झाल्याने तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता अशातच अखेर उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला घटनेच्या दिवशी पासून हल्ला चढविणारा पती आरोपी हा फरार असल्याने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पतीला नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे
खलीदाबी मोहम्मद आतिक वय 37 असं हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेचं नाव आहे तर मोहम्मद आतिक मोहम्मद खलीक असं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथून ताब्यात घेतलेल्या आरोपी पतीचं नाव आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्णी येथे राहणाऱ्या मोहम्मद आतिक मोहम्मद खलीक व खलिदाबी मोहम्मद आतिक हे दोघेही पती-पत्नी असून काही दिवसांपूर्वी शुल्लक कारणावरून दोघात वाद झाला या वादात पती आतिक नं पत्नीवर जोरदार हल्ला चढविला या हल्ल्यात खरीदाबी ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार घेत असताना खलिदाबी यांचा मृत्यू झाला. घटनेच्या दिवशीपासून आरोपी आतीक हा फरार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मार्गावर होते अशातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी आतीक हा नागपूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर शहरातील म्हाडा कॉलनी उपलवाडी येथून सापळा रचून आरोपी मोहम्मद आतिक मोहम्मद खलीक याला ताब्यात घेऊन आर्णी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे आर्णी पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळच्या पथकाने केली आहे