निकालापूर्वीच उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष.
निकालापूर्वीच उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष.
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे. परंतु पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले.
या बॅनर वर “ विजय निश्चित ” अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही.
आणि समोर महाविकास आघाडी…. शुभेच्छुक राजू दुधे मित्र मंडळ असे आशय युक्त बॅनर असून बॅनरवर एकीकडे नगर पालिका माजी पाणी सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देताना फोटो आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.
या लोकसभा यवतमाळ वाशिम च्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हा तिढा अजूनही सुटलेला नसून निकालापूर्वीच अशा प्रकारची बॅनरबाजी काय संदेश देऊ इच्छित आहे. विविध प्रसार माध्यमांमार्फत जेव्हा जनतेचे मत घेण्यात आले. तेव्हा काहींनी महायुती चे उमेदवार राजश्री पाटील ह्या निवडून येतील असे म्हंटले तर काहींनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख निवडून येतील असे म्हटले. मुळात या प्रश्नाचे उत्तर येत्या 4 जून रोजी मिळेल हे मात्र नक्की. कोणता चेहरा निवडून येईल हेही त्याच दिवशी कळेल. मतदाता म्हणून तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल ? आता महाविकास आघाडी प्रमाणे महायुतीही बॅनरबाजी करेल का ?