
96
यवतमाळ (प्रतिनिधी):- महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून सर्वमान्य आहेत, व त्यांना गुरु म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र उभारणी करीता समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेचा पाया भक्कम रचला आहे. या दोन्ही महामानवांना स्मृतिदिनी अभिवादन करण्या करिता 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये यवतमाळ येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात येते. त्याचे पहिले उद्घाटकीय वैचारिक पुष्प 28 नोव्हेंबर ला गुंफण्यात आले.

देशातील सामाजिक परिस्थिती अत्यंत आमूलाग्र बदल होत असून ओबीसींना समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आरक्षणाचा मुद्दा कशासाठी आहे हे समजून घेणे गरज असतांना आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये सुद्धा माणसं सुरक्षित राहील का असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवतेचा तत्त्वज्ञान अर्पण करून मानवतावादी विचार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधकी विचारांची आज जगाला गरज आहे. त परिवर्तना सोबतच येणाऱ्या भविष्य काळामध्ये होणारी क्रांती ही ओबीसींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारी असून ती सत्यशोधकीय क्रांती राहील असे प्रतिपादन ओबीसी प्रवर्गात समोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर आपलं मत प्रा. सुदाम चिंचोले सत्यशोधकीय विचारवंत भारतीय पिछडा सोशीत समाज औरंगाबाद यांनी व्यक्त केलं.
देशातील बदलणाऱ्या परिस्थितीवर प्रकाश टाकत असताना महाराष्ट्रातील महिलांनी क्रांती करून स्त्रीवादाची पायाभरणी पहिल्यांदा सुरुवात केली आहे. तर कामगारांच्या चळवळींचा आदर्श ठेवून मेघाजी लोखंडेची चळवळ सुद्धा ही आपणास प्रेरणादायी असताना शोषणाचे मूळ कुठे आहे हे शोधणे सध्या गरजेचे आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये विद्यापीठाचं आणि मंदिरात राजकारण प्रचंड प्रमाणामध्ये सुरू असून केंद्र सरकारला जर सामाजिक दृष्टिकोनातून मोठे पाऊल उचलायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम अभिमत विद्यापीठाचा सारख्या विद्यापीठाच व मंदिराचं राष्ट्रीयीकरण करावं. सामाजिक बदलाची ही सर्वात महत्त्वाची भूमिका राहिल परंतु याबाबत कुठलेही पाऊल केंद्रसरकार उचलायला तयार नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील तमाम शोषितांच्या त्यासाठी केलेले कार्य अतुलनीय असून महामानवाचा आदर्श त्यांनी आपल्या हृदयात सातत्याने जोपासला आहे. म्हणूनच परिस्थितीला अनुसरून आता ओबीसींनी जागृत व्हायला पाहिजे. कोरोनाच्या महाभयानक काळामध्ये खाजगी रुग्णालय बंद होती आणि शासकीय रुग्णालय सुरू होती यावरून बांधवांनो शासनाच्या पातळीवर असणाऱ्या योजना किती महत्त्वपूर्ण असतात हे सर्वात महत्त्वाचं कार्य आपण समजून घेतलं पाहिजे.आरोग्याचे राष्ट्रीयीकरण होणे हेही तेवढेच गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचलता येणार नाही. समाज संधीच्या लढाई करिता सातत्याने ओबीसींनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले पाहिजे. त्याशिवाय आपणाकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही. ही आपली जनगणना ही शेवटची लढाई आहे ‘अभी नही तो कभी नही’ हि वेळ आपणावर येऊन पडली आहे. यासोबतच त्यांनी आरक्षण, भांडवलदार नवीन संस्कृती तसेच केंद्रातील ओबीसींच्या असणाऱ्या जागा व जाती व्यवस्थेवर आधारित असणाऱ्या विविध संघटनांवर शासनाने बंदी सुद्धा घातली पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी केले. अध्यक्षीय भाषण ज्ञानेश्वर गोरे यांनी केले तर बीजभाषण विलास काळे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बी पी एसएस यांनी केले मंचावर सुनिता काळे, दिलीप बेलसरे, अरुण मेहेत्रे, अशोक तिखे, मायाताई गोरे, विनोद इंगळे, संतोष झेंडे, कमल खंडारे, डॉ. संजय ढाकुलकर , दीपक वाघ ,आनंद गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कल्पना मादेशवार यांनी केले तर आभार नीता दरणे यांनी मांनले.
सात अंतरजातीय दाम्पत्यांचा जाहीर सत्कार
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक दायित्वच्या लढाईत सहभागी असणाऱ्या व सत्यशोधकी क्रांती करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील सात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. संदीप ठाकरे सोनाली तोडासे, गौरव डंभारे शितल वाडाइ, पवन मांढरे वैष्णवी आगरकर, मोहन सेलोडकर स्नेहा ऊईके, प्रतीक गेडाम दुर्गा राजपूत, मयुरी नागतोडे अमित सराटे, सुभाष मडावी प्रीती कासार , यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.